Posts

Showing posts from September, 2018

नशा

Image
******* लेखक सोमनाथ कोळेकर नशा ******* हो पितो मी रोज दारू.. पण ती उतरली की कळतं वेदनेची किंमत १००० रुपयांपेक्षा नक्कीच जास्त आहे.. रथाचा सारथी होणं ते किती जिकिरीचं.. एक चाक अवेळ ी निखळ की.. वेळेच्या अश्वाना समजतच नाही.. ती आपली धावत राहतात.. कर्तव्यपूर्ती साठी.. रथ मात्र फिरत राहतो एकाच जागी.. वेदनेची गोलाकार वर्तुळ रेखत.. १५ वर्ष झाली तिला जाऊन.. तिची जागा घेणाऱ्या बऱ्याच सापडल्या असत्या.. पण तीन चार वर्षाचा तो लोभसवाना गोळा.. हुबेहुन तिच्यासारख्या दिसणारा.. भावनेला काटेरी कुंपण घालत गेला.. तिच्यासाठी जे जे करायचं ते सगळं त्याच्यासाठी करत गेलो.. तिने वडा भोवती मारलेल्या फेऱ्या सात जन्मा साठी होत्या.. त्या दोऱ्याच्या गाठी पहिल्याच जन्मात ढिल्या होतील तरी कश्या.. मोडक्या रथाची ती घरघर पिंजऱ्यात कोंडून ठेवली छातीच्या.. ओठाच्या दरवाजातून ती बाहेर डोकावतील इतकी सैल झालीच नाही कधी.. तुझी आठवण येत नाही असं काही नाही.. ती क्षणा क्षणाला येते.. मग मी तू माघारी सोडलेल्या जिवंत जीवकडं पाहून निभावून नेतो सारं.. असा एक अंतिम क्षण येतोच दिवसात.. की असह्य होत हे सारं.. मग हा तांबूस खंबा आप...

दोस्ती मराठी कविता

Image
आटपाटनगरातील गोष्टी पुस्तकात भारी वाटतात.. पण एकमेकांच्या मनावर राज्य करणारा तू ,तो, हा आणि मी वास्तव जीवनाच्या पुस्तकातील राजकुमारांपेक्षा कमी थोडेच आहोत.. कालदर्शिकेच्या मुहूर्ताला फाटा देत आपल्या भेटीने एक सुवर्णयोग असलेला आपला एक मुहूर्त तयार करणारे तुमच्यासारखे कमीच असतात.. ना संपणारी शिदोरी गोळा करताना थोडीसी भूक मात्र कायम राहते पुन्हा भेटण्याची.. लब्यु भावांनो.. तुझी माझी यारी मग भोकात गेली दुनियादारी !

खोटी नाती

Image
सैल केली मीही तेव्हा, मूठ हव्याश्या नात्यांची.. पाहिले दवं पानावरी, आनंदाने उन्हात आटताना.. " खोटी नाती लेखक सोमनाथ कोळेकर

लेखणी

Image
व्हावा शिरच्छेद माझा.. असावे शस्त्र शब्दांचे .. चढावी धार पात्याला... लेखणीने तुझ्या.. लेखणी